रंगपंचमीच्या दिवशी आंघोळी साठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडुन मृत्यू

प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यातील अखेरच्या टोकावर असलेल्या मुडीकोटा येथील काही तरुण युवक रंगपंचमीच्या दिवसी रंगाची उधळन करुन आघोड करण्यासाठी दे वाडा खुर्द येथे वैनगंगा नदीवर रंगाने भरुन गेलेले चार ते पाच तरुण युवक गेले असता पाच मिञा पैकी एक तरुण युवक अमीत पुरुषोत्तम नागदेवे वय 28 वर्ष राह.मुडीकोटा यांचा पाय घसरुन वैनगंगा नदीत बुडुन मृत्यू पावलयाची हदय दायक घटना रंगपंचमी च्या दिवसी दुपारच्या दरम्यान घडली असुन तेथील स्थानीक मासेमारी करण्याच्या मदतीने मृत देहाचा शोध घेण्यात आला पंरतु तब्बल चार तासानंतर मृत देह शोधुन काढण्यात स्थानीक मासेमारी करणारयाना यश आले .
सदर घटनेची नोंद करडी पोलिस स्टेशनला करण्यात आली .पोलीसांनी पंचनामा करुन मृत देह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविली आहे
मुडीकोटा गावातील तरुण युवकाचा नदीत बुडुन मृत्यू पावलयानी गावात शोककळा पसरली आहे तरुण युवकाचा मृत देहावर आज अंतिम संस्कार विधी करण्यात आला.