जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुर पॅच येथिल टिनाचा छत चक्रीवादळात उडाले मात्र जिवित हाणी टळली
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
अहेरी तालुक्यातील बोरी केद्रा अंर्तगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुर पॅच येथिल शाळा दुरुस्ती जिल्हा वार्षिक योजनेतुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपूर पॅच शाळेचे दुरुस्ती करण्यात आले.मात्र सदर काम करुन फक्त तीन महिणे सुद्धा झाले नाही ,त्यातच चक्रीवादळाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपूर पॅच वर्ग खोली वरती टिनाचा छत उडाले हवेची तिव्रता येवढी होती की. टिना चे छत शाळेच्या पटांगणात कोसळले आहेत जिल्हा परिषद शाळेत तेंदूपत्ता बोध भरायचे मजूर गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होते शाळेच्या आवारात बाहेर बसलेले मजूर आपला जीव मुठीत घेऊन सोडकी पडो केले त्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही,या कामचा दर्जा कितपत बरोबर आहे. सदर कामाची सखोल चौकशी करुन या कामच्या देखरेखेसाठी नेमलेल्या अधिकारी याचेवर कार्यवाही करण्यात यावी. अधिकाऱ्याच्या लापरवाही मुळे असे बेजबाबदारपणाचे कामे करून भविष्यात शिक्षण घेणा-या मुलांनाची जिवित हाणी होऊ शकतेहे विशेष. बेजबाबदार अधिका-यावर कारवाही करावी. असे शाळा व्यवस्थापण समिती यांची मागणी केलीआहे.