ताज्या घडामोडी

आ. किशोर जोरगेवारांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपूजन

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांने मतदारसंघात मंजुर विकास कामांचे सध्या भूमिपूजन केल्या जात आहे. दरम्यान स्थानिक आमदार निधी अतंर्गत वेंडली आणि चंद्रपूर येथील लिंगायत समाज समाधी स्थळ येथे मंजुर विकास कामांचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते विधिवत भुमिपूजन करण्यात आले.

या मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आमदार जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असुन मतदार संघातील ग्रामिण आणि शहरी भागाच्या विकासासाठी मोठा निधी आमदार जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून विकासकामांना गती मिळाली आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहे. तर अनेक कामे प्रस्तावीत आहे. दरम्यान वेंडली येथे समाज भवन बांधण्याची मागणी स्थानिकांनी आमदार जोरगेवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार जोरगेवार यांनी सदरहु समाज भवनासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून २० लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून वेंडली ग्रामपंचायतीच्या जागेवर तयार होत असलेल्या समाज भवनाचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते आज भुमिपूजन करण्यात आले. या वेळी वेंडलीच्या सरपंच प्रतिभा अलवलवार, उपसरपंच राजकुमार नागपूरे, संध्या पिंपळशेंडे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, मुन्ना जोगी, जंगलु पाचभाई, संजय टोंगे, सुरेश तोतडे, प्रवीण सिंह, श्रीरंग वरारकर, रविंद्र पिंपळशेंडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लिंगायत समाज समाधी स्थळाच्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सदर कामासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून १३ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. सदर कामाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, विलास वनकर, राशेद हुसेन, रमेश मुलकावार, संजय धारणे, विवेक वल्लपकर, प्रशांत मेडपिलवार, मनोहर बोक्कावार, कल्पना धारणे, भरत वाघीडे, श्रिकांत चिंतावार, सुरेश जक्कनवार, सतीश चिल्लुरे, संगिता देवांग, चंदा धारणे, अर्चना चिंतावार, वैशाली चिंतावार, विजया मुलकावार, मिना शेंडे, अर्चना डांगरे, लक्ष्मी चिंल्लोरे, एकता पिंतुलवार, राधिका वलभकर, सुनिता धारणे, जया व्यवहारे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close