श्री पंढरीनाथ देवस्थान नेरी येथे संगितमय श्रीरामचरित मानस ज्ञानयज्ञ सत्संग सप्ताह साजरा

प्रतिनिधी:राहुल गहुकर
चिमुर तालुक्यातील नेरी येथील पेठ विभागातील श्री पंढरीनाथ देवस्थान पेठ विभाग तथा समस्त ग्रामवासीय जनतेच्या वतीने संगीतमय श्रीराम चरीत मानस ज्ञानयज्ञ सत्संग सप्ताहाचे गुरुवार दि ४ जानेवारी २०२४ ते गुरूवार दि ११ जाने २०२४ पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .कथा प्रवक्ता म्हणून सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे (आळंदीकर) जि. अमरावती ह्या आहे. ४ जानेवारी ला घटस्थापना करुन सप्ताहाची सुरवात करण्यात आली त्यानंतर दररोज सकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत सामुदायिक ध्यान, सकाळी ८ वा. गावातील प्रत्येक वार्डातुन रामधुन काढण्यात आली. सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यंत हरिपाठ हरीओम बाल हरिपाठ मंडळ हिवरा- हिवरी हेमंत कुबडे आणि संच ता. उमरेड जि नागपूर यांचे विशेष आकर्षण हभप नामदेव अलोने महाराज यांचे भारुड होते आणि सायंकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे ( आळंदीकर) जि. अमरावती यांचे अम्रुतमय वाणीतुन प्रवचनाचा लाभ भाविक भक्त उपस्थित घेत होते या सप्ताहाची सांगता दि ११ जानेवारी रोज गुरवारला दु. १२ ते ४ पर्यंत गोपाल काल्याचे कीर्तनाने सुश्री — स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे (आळंदीकर) जि अमरावती यांच्या अम्रुतमय वाणीने होणार आहे तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ५ वा सुरू होणार आहे या सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सौ रेखा पिसे सरपंच ग्रा. पं नेरी, आ.बंटी भांगडीया विधानसभा क्षेत्र, मंगेश चांदेकर अध्यक्ष व्यापारी युनियन नेरी, दादाराव पिसे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी, रूपचंद चौधरी अध्यक्ष शंकरजी देवस्थान नेरी, अशोक लांजेकर अध्यक्ष जगन्नाथ बाबा मंदीर नेरी, प्रा. राम राऊत सर ग्रामगीता चार्य नेरी, कमलाकर लोणकर सामाजिक कार्यकर्ते नेरी यांच्या व समस्त गाववासीयांच्या उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप गोपाल काला व महाप्रसादाने होणार आहे तरी नेरी व समस्त जनतेनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पंढरीनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने तथा गाववासीयांकडुन करण्यात येत आहे.