ताज्या घडामोडी

“शैक्षणिक पुस्तकांसोबत भारतीय संविधानाचे वाचन करुन संविधान संस्कृति आचरणात आणा”- प्रा.डॉ. दिशा गेडाम यांचे विद्यार्थ्याना आवाहन

▪️संविधान मैत्री संघ, एम जी पैरामेडिकल, अंधश्रद्धा निर्मूलन समिति व वनकर कैरियर अकैडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव स्पर्धा परीक्षा उत्साहात सम्पन्न

▪️200 च्या वर विद्यार्थी परीक्षेत शामिल.

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

गोंदिया – “आम्ही जो पर्यन्त मन लावून पुस्तका वाचन करणार नाही, त्यातले खरे ज्ञान ग्रहण करणार नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाला प्रत्यक्ष जीवनात उतरवु शकणार नाही। येणा-या पीढ़ीच्या उज्ज्वल भविष्यासाठी “भारतीय संविधान” हे ग्रंथ उत्तम ग्रंथ आहे। संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरानी गाढ़े अभ्यास करून सर्व समाजाला घेऊन व सर्वाना आदर्श ठरेल असा अनमोल ठेवा आपल्याला दिला आहे। या भारतीय संविधानाचे वाचन करा व दैनंदिन जीवनात संविधान संस्कृति आचारणात आणा” असे आवाहन स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित स्थानिक एस एस गर्ल्स कॉलेज येथील प्राध्यापिका तसेच आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ दिशा गेडाम यानी विद्यार्थ्याना केले.
संविधान जागृति सप्ताह अंतर्गत संविधान मैत्री संघ, एमजी पैरामेडिकल कॉलेज, अंधश्रद्धा निर्मूलन समिति, वनकर कैरियर अकैडमी यांच्या संयुक्त विद्यमाने “संविधान गौरव स्पर्धा परीक्षा” मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित स्पर्धकाना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. दूसरे परीक्षक म्हणून उपस्थित सुशील वनकर यानी मार्गदर्शना करताना ” योग्य प्रशासनाकरीता योग्य घटना किंवा कायद्याशिवाय पर्याय नसतो. घटने शिवाय कोणत्याही राष्ट्राची कल्पना करता येऊ शकत नाही, भारतीय संविधान ही जगातली आदर्श राज्य घटना आहे, त्यामुळेच आम्ही सर्व स्वतंत्र बन्धुत्वाने नांदत आहोत” असे प्रतिपादन केले.
एम. जी. पैरामेडिकल कॉलेज येथे आयोजित “संविधान गौरव स्पर्धा परीक्षा” कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविक वाचनाने झाली। विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदर स्पर्धेत 200 च्या वर स्पर्धकानी भाग घेतला. याप्रसंगी स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ दिशा गेडाम, एम.जी. पैरामेडिकल कॉलेज चे संचालक अनिल गोंडाने, वनकर कैरियर अकैड़मी चे संचालक सुशील वनकर, आयोजक मंडळ संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, प्रा.अनुसूया लिल्हारे, प्रीति वैद्य, शारदा भैसारे, छाया राणा, आरती चौधरी, ललीत ढबले , राजू रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close