ताज्या घडामोडी
पाथरी शहरातील विविध सरकारी कार्यालयात मतदार जनजागृतीचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप टीम द्वारे पाथरी शहरी भागात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी मा.शैलेश लाहोटी, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मा.शंकर हांदेशवार ,तसेच गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप टीम नोडल अधिकारी मा.मुकेश राठोड यांच्या
मार्गदर्शनाखाली व शंकर धावारे सर, धम्मपाल उघडे सर व किशन डहाळे सर यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाथरी,एस टी स्टँड,पाथरी तसेच गटसाधन केंद्र,पाथरी, पंचायत समिती कार्यालय पाथरी तसेच मुद्रांक व नोंदणी कार्यालय,पाथरी येथे मतदार जनजागृती संबंधी शपथ देण्यात आली.तसेच मतदान जागृती विषयीचे बॅनर सर्व कार्यालयात दर्शनी भागात चिटकवण्यात आली.तसेच मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.काढण्यात आली. मतदारांना लोकशाही चे महत्व पटवून देण्यात आले.