बिबटाच्या हल्यात गाय ठार

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
गोंडपीपरी तालुक्यातील चिवंडा येथे गोठ्यात बांधून असलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. दिवसभर शेतात जनावरे चराईकरिता नेऊन संध्याकाळी घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवली असता बिबट्या ने गोठ्यात शिरकाव करून गाईवर हल्ला चढवीत गायीला ठार केले.
बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली गाय लक्ष्मण नारायण पुल्लूरवार रा.चीवंडा यांच्या मालकीची असून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
त्यामुळे संबधीत विभागाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.
कन्हाळगाव अभयारन्यात वाघ बिबट, चितळ ,हरीण ,यासह अन्य वन्यजीवांचाअधिवास आहे. अधिवास कक्षाबाहेर वन्यजीव येत असल्याने मानव – वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अश्यातच जंगलक्षेत्रालगत असलेल्या
चिवंडा परिसरात गोठ्यात बांधून असलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने व बिबट्या मादी दोन बछड्यासह परिसरात वावरत असल्याने नागरिकांत भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.