ताज्या घडामोडी

नागभीड जंक्शन रेल्वेस्थानकावर गया चेन्नई सुपरफास्ट ट्रेन चे जल्लोषात स्वागत

खासदार अशोकभाऊ नेते यांच्या हस्ते नागभीड येथील थांब्याच्या शुभारंभ सोहळा संपन्न .

दपुम रेल्वे नागपुर मंडल प्रबंधक श्रीमती नमिता त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती

तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड

गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी नागभीड जं. रेल्वेस्थानकावर गया चेन्नई १२३८९/१२३९० या सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनचा चा थांबा सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्नाने मंजुर केल्याने ०९ एप्रिल २०२३ रविवार ला रात्री शुभारंभ सोहळा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी ट्रेन ड्रायव्हर व गार्डचे मिठाईने तोंड गोड करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे झेडआरयुसीसी सदस्य तथा भाजपा संघटन जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभाग प्रबंधक श्रीमती नमिता त्रिपाठी मॅडम, डीईएन साऊथ एस.एम. नामदेव, सिनिअर डिसीएम रवेश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे , पत्रकार मंडळी , अनेक कार्यकर्ते व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नागभीड येथे मिळालेल्या या गाडीचा थांबा प्रायोगिक तत्वावर असुन नियमित होण्यासाठी प्रवाशी संख्या वाढविण्याची जबाबदारी आता नागरिकांची व प्रवाशांची असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी खासदार नेते यांनी केले. यावेळी दपुम नागपुर मंडल रेल्वे प्रबंधक नमिता त्रिपाठी यांचेशी खासदार नेते व उपस्थितांनी रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न व समस्यांसदर्भात सविस्तर चर्चा केली . विशेषत: चांदाफोर्ट- जबलपुर ट्रेनचा थांबा नागभीड येथे मिळावा याचे निवेदन संजय गजपुरे व सहकाऱ्यांनी खासदार नेते व मंडल प्रबंधक यांना दिले.
या शुभारंभ सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागभीडकर जनतेने मध्यरात्रीच्या वेळेसही गर्दी केली होती . या साप्ताहिक गाडीमुळे गया, सासाराम , जबलपुर , सतना , कटनी , चेन्नई ई. ठिकाणी जाण्यासाठी प्रवाश्यांना थेट सोय उपलब्ध झालेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close