ताज्या घडामोडी
सामाजिक क्षेत्रात चंद्रपूरच्या कोकिळा पोटदुखेंचे योगदान मोलाचे

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर शहरातील जटपूरा वार्ड निवासी सुपरिचित समाजसेविका कोकिळा पोटदुखे यांचे आजपर्यंत सामाजिक क्षेत्रातील योगदान अतिशय उल्लेखनीय ठरले आहे.
मागिल वर्षी त्यांना त्यांच्या उल्लेखनिय व अतुलनीय कामगिरी बाबत एका सामाजिक संस्थेकडून मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले होते.
सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांना ब-याच अडचणी आल्या पण त्यावरही मात करत त्यांनी आपले कार्य तसेच जोमाने सुरू ठेवले.
मुख्य मार्गदर्शिका असलेल्या मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांच्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या कोकिळा पोटदुखे ह्या एक सदस्य आहेत.