ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा होमगार्डचे उजळणी प्रशिक्षण शिबीर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी येथील होमगार्डचे जिल्हा प्रशिक्षण केंद्रात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने पुरुष होमगार्डचे उजळणी प्रशिक्षण शिबीरास दि. 19 पासुन सुरूवात झाली आहे.
होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस
अधिक्षक श्री. यशवंत काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने होमगार्डचे जिल्हा प्रशिक्षण केंद्रात केंद्र येथे पुरुष होमगार्डचे (एकूण 70 जवान) निवासी उजळणी प्रशिक्षण शिबीर दि. 19 जानेवारी ते दि.26 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. सदर प्रशिक्षण शिबीरात होमगाईसना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये शारीरीक कवायत शस्त्र कवायत, विमोचन, अपात सहायता, अग्निशमन लाठी कवायत, पदकवायत इत्यादी प्रशिक्षण पाठ्यक्रमाचे शिक्षण देणे करीता जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्र नायक श्री. प्रताप बागल यांचे सह मानसेवी अधिकारी वरिष्ठ पलटन नायक बालू तनपुरे,. गंगाधर कटारे; पलटन नायक गणेश खुणे, रानबा सुतारे, सय्यद तौफिक हे प्रशिक्षण देणेचे कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच प्रशासकिय कामकाज होमगार्डचे प्रशाकिय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर निकम हे पार पाडत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close