ताज्या घडामोडी

मरेगाव वाघ शिकार प्रकरणाची सखोल चौकशी करा

वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांची मागणी

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत मरेगाव कक्ष क्रमांक २६१एक महिण्याअगोदर वाघाची शिकार करुन अवयव काढल्याचे धक्कादायक प्रकरण बाहेर आले. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडुन ११नखे , १६मिशांची केसं, ४ हाड व ४ दाते जप्त करण्यात आली. चारही आरोपिंना अटक करण्यात आली.

सिंदेवाही तालुक्यात आंतराष्ट्रीय वन्यजीवांची शिकार करण्याची टोळी सक्रिय झाल्याची शंका आहे. चार आरोपी व्यतिरिक्त अनेक आरोपी या शिकार प्रकरणात सामिल असल्याचा अंदाज आहे. वनविभागाने आपली तपासाची चक्रे वाढवावी. सध्या सिंदेवाही तालुक्यात वाघांची शिकार करणारी अंतराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा अंदाज आहे. या क्षेत्रात शिका-यांचे धाडस वाढले आहे.यावर शिका-यांच्या मुसक्या आवळुन पायबंद घालणे गरजेचे आहे.सिंदेवाही तालुक्यात अनेकदा वारंवार वाघ शिकार प्रकरणे समोर येत आहे. यामुळे वाघांच्या संवर्धनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या मरेगाव वाघ शिकार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे.

अंधश्रद्धेसाठी या अवयवांचा वापर करण्यात आला. या आरोपींची कसुन चौकशी केल्यास बाकिच्या आरोपीचे सुराग मिळेल. वन्यजीव संरक्षण अधिनियम व अंधश्रद्धा निर्मूलन नुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

” वनविभागाने’ वन्यजीव क्षेत्रात काम करणारे एन.जी .ओ यांना आपल्या सोबत सामाऊन घ्यावे. जेणेकरून वाघांच्या हालचाली, मार्गक्रमण, देखरेख यावर बारकाईने लक्ष ठेवता येईल व वनविभागाला मदत होईल.तसेच पेट्रोलियम करणारे स्पेशल गस्त पथक सिंदेवाही वनपरिक्षेत्र ला द्यावे. “
कवडू लोहकरे
वन्यजीव प्रेमी सिंदेवाही

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close