गुरुदेव सेवा संताजी महिला भजन मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नाही कुणा पुढे झुकला, नाही कुणा पुढे वाकला, नाही भित कोणाला वाघ म्हणतात या मर्दाला, असा मर्द मराठा शिवराय एकला! शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली. 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानची दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चंद्रपूर शहरातील स्थानिक गुरुदेव सेवा संताजी महिला भजन मंडळाचे वतीने काल शनिवार दि. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा करण्यांत आला . एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची साथ होती आई भवानी व माता जिजाऊ ची मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी….!! प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान आहे. शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर स्वतंत्र नीतीमान आणि सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते. 19 फरवरी हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची किर्ती! राजा शोभून दिसे जगती! असा तो शिवछत्रपती….. राजे असंख्य झाले आजवर या जगती! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला, गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती …!! या कार्यक्रमाला तुकुम येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा गुरुदेव सेवा संताजी भजन मंडळाच्या,अध्यक्षा चंदा ईटणकर ,उपाध्यक्षा संगिता चिताडे ,सदस्या निर्मला ईटणकर, सुनिता कदम ,सुलोचना शेन्डे, कुमुद खनके ,अंजली ईटणकर, वंदना ईटणकर , कल्पना खोब्रागडे मिनाताई ईटणकर व इत्तर महिला सदस्या उपस्थित हाेत्या .