तलाठी चंदा ठाकरेंना यंदाचा आदर्श तलाठी पुरस्कार घोषीत

महाराष्ट्र दिनी स्विकारणार त्या “हा “पुरस्कार
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपूरी तालूक्यातील चौगाण या साजाच्या महिला तलाठी चंदा ठाकरे यांना यंदाचा आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे .त्यांना हा पुरस्कार येत्या १मे ला महाराष्ट्र दिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत (पाच हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देवून) सन्मानित करण्यात येणार आहे .
ब्रम्हपूरीच्या तहसीलदार उषा चौधरी व मंडळ अधिकारी नरेश बोधे यांचे मार्गदर्शनाखाली महिला तलाठी चंदा ठाकरे यांनी
सन 2021-22 या वर्षात
मुदतपूर्व शासकीय वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण करून
तब्बल 65 अतिक्रमण प्रकरणे शोधून नियमानुकुल करण्यास प्रस्ताव पाठवले व ती अतिक्रमणे नियमाकुल करण्यात आली . या शिवाय गरजू लाभार्थींना पट्टे मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे . एव्हढेच नाही तर
शेतकरी व विद्यार्थी यांचे सोबत त्यांची नेहमीच सौजन्यपूर्वक वागणूक राहिली आहे .एक आदर्श महिला तलाठी म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यात चंदा ठाकरे यांची ओळख आहे.