अशोक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी एस.झेड.देशमुखसर यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आमचे मार्गदर्शक उंचखडक बुद्रुक गावचे सुपुत्र तसेच शिवव्याख्याते महाराष्ट्र राज्याचे पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष आदरणीय श्री.सोपानराव देशमुख(एस.झेड.देशमुखसर) यांची संपुर्ण राज्यभर विस्तार असलेल्या अशोक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली असुन उंचखडक बुद्रुकच्या ग्रामस्थांच्या,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्यांच्या तसेच जिजामाता महिला सहकारी दुध संस्थेच्यावतीने सरांच्या निवडीचे स्वागत केले. अशोक सहकारी बँकेस तीन वेळा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे.अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक आदरणीय श्री.अशोकराव देशमुख यांनी सरांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सरांच्या आभ्यासाचा यापुढील काळात बँकेच्या विस्तारासाठी व प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल असे म्हटले.