अतोनात बिनारीडींगचे भरमसाठ विजबिले लादून सामान्यांची लूट
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
मिनीमम चार्जेस च्या नावावर वसुली करून महावितरणची चांगलीच दिवाळीचे स्पप्न…..
चिमूर :- सहा महिने लॉकडाऊन व जनता कर्फ्युत अगोदरच आर्थिक संकटाचा सामना करीत असलेले गोरगरीबांना आता महावितरणने आपली औकात दाखवायला सुरूवात केली असून ६ महिन्याचे विनारीडींग व मिनीमम चार्जेस नावावर वसुली करून अधिकारी कर्मचारी यांची यावर्षी चांगलीच दिवाळी करण्याचे षडयंत्र करण्याची अफलातून योजना अंमलात आणली पण याने गोरगरीब कुटूंबांतील मुख्य व्यक्तींच्या मनावर विपरीत परीणाम होऊन मनस्थिती काय करेल ही भयंकर स्थिती व शक्यता नाकारता येत नाही. याकडे अतितात्काळ या संवेदनशिल प्रकरणाकडे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष केंद्रित करण्याची विनंती चिमूरचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद पठाण यांनी आपले मनोगत पत्रकारांकडे व्यक्त केले आहे.
चिमूर मध्ये काही ग्राहकांना एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हे मिनीमम ३४ युनिट विनारीडींग दर्शविले व चक्क सप्टें ऑक्टों महिन्याचे १९० युनिट थोपवून काही लोकांना १०,००० च्या वर विजबिले लादून सामान्यांची मनस्थिती महावितरणने बिघडवली, चिमूर परिसरात काही लोकांना ३ हजार कमी करून दिले, काहींचे तर अर्धी रक्कम कमी करून दिली हा अंकयुनिट बजट फंडा त्यांच्या डोक्याच्या बाहेर असून अधिकारी यांच्या हो ला हो मिळवितात व यावर्षी चांगलीच दिवाळी करण्याचे षडयंत्र महावितरणने अतोनात बिनारीडींगचे भरमसाठ विजबिले लादून सामान्यांची लूट करून लोकांची मनस्थिती बिघडवण्याचे काम करत असून या ज्वलंत प्रश्ना्कडे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जातीने लक्ष केंद्रित करून होत असलेली जण सामान्य माणसाची लूट थांबवावी अशी विनंती अल्पसंख्याक चे अध्यक्ष जावेद पठाण चिमूर यांनी केली आहे.