पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संगीता वाघमारे यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संगीता वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ संघपाल उमरे सर आणि सचिव विनोद पत्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 / 07 / 2022 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता सामाजिक उपक्रम म्हणून समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला सौ.संगीता वाघमारे पाथरी शहरात आणि ग्रामीण भागात अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत पाथरी च्या विविध शाळा , महाविद्यालयात भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत विशेष म्हणजे किशोर मुलींना मार्गदर्शन करून समाजात वावरताना आत्मविश्वास ने वागावे कोणतीही भिती मनात निर्माण करू नये संगीता वाघमारे यांचे समाज सेवेची कार्य आणि आवड पाहून पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला सोबत पत्रकार कदम , राजकुमार कांबळे , समाज सेवक आणि पत्रकार महेश यु जोशी सर आणि कृष्णा कांबळे अहमद अन्सारी उपस्थित होते.