सावित्रीबाई फुले यांच्या जयघोषाने नेरी शहर दुमदुमले

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
दि. ३ जानेवारी २०२३ ला सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज नेरी च्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी नेरी, सरडपार व उसेगांव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरी येथील मुख्य मार्गावरून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रिबाई फुलेंच्या जयघोषाने नेरी शहर दुमदुमले. या मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी सावित्रीबाई फुले व ज्योतीराव फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा साकारण्यात आली. मिरवणुकी नंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. संजयभाऊ डोंगरे, प्रमुख मार्गदर्शक श्री. देवानंदजी कावळे (नाट्यकलावंत), सत्कारमूर्ती श्री किशोर मेश्राम (हेड कॉन्स्टेबल चंद्रपूर), प्रमुख अतिथी श्री. रामदासजी सहारे, प्रभाकरजी लोथे सर, सौ. अर्चनाताई डोंगरे मॅडम, सौ. लालिताताई कडूकार, वसंतराव कामडी, विजयराव कडुकार, राजीवजी पडवेकर, गजानन लांजेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या ३ दिवसीय जयंती महोत्सव निमित्त
दि. 1/1/2023 ला श्री. दिपक भांडेकर महाराज यांचा सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावर रात्रो प्रबोधनाचा कार्यक्रम.
दि. 2/2/2023 ला रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम.
दि. 3/3/2023 ला सावित्रीमाई जोतीराव फुले यांची शोभायात्रा व गौरवपराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. पांडूरंग मेश्राम सर व आभार प्रदर्शन श्री. राकेश सहारे सर यांनी केले. शेवटी स्नेहभोजन करण्यात आले याप्रसंगी सर्वाचे मोलाचे सहकार्य लाभले.