नेरी येथे 275 नागरीकांनी घेतला आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचा लाभ

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
शिवसेना पक्षातर्फे शिवसेना जिल्हा चंद्रपूर व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमानाने शिवसेना पक्ष नेरी उपतालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात नेरी ग्रामपंचायतीच्या मदतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर पंढरीनाथ देवस्थान नेरी येथे संपन्न झाले .

शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य श्री नीतिनभाऊ मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख श्री मुकेशभाऊ जीवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख श्री अमृतभाऊ नखाते, व विधानसभा समन्वयक श्री भाऊरावभाऊ ठोम्बरे यांचे मार्गदर्शनात शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर नेरी येथील पंढरीनाथ देवस्थान येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन ग्राम पंचायत सदस्या सरीता जनबंधु व संगीता कामडी यांचे हस्ते करण्यात आले शिवसेना उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे नेरी शहर प्रमुख चेतन पिसे, मदन शिवरकर, कामेश नगराळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले. नेरीतील 274 नागरिकानी तपासणी केली.
कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता उपतालुका प्रमुख किशोर ऊकुंडे यांचे नेतृत्वात डॉ. तेजस ठोम्बरे, डॉ. एकनाथ शिंदे, सुनिल हिंगनकर यांनी अथक परिश्रम घेतले.