ज्ञानदान हेच खरे दान आहे सौ.भावनाताई नखाते

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम हे शिक्षक करत असतात. शिक्षकांमुळे समाजाची व राष्ट्राची जडणघडण होते, शिक्षक हा समाजातील एक प्रमुख घटक आहे भावी पिढी घडवण्याचे अनमोल कार्य शिक्षकांच्या हातून होत असते, म्हणूनच शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी समाजाने यायला हवे, उत्कृष्ट शिक्षणामुळेच राष्ट्र प्रगतीपथावर जाते. शिक्षक हे ज्ञानार्जनाचे कार्य करत असतात त्यामुळे ज्ञानदान हेच खरे दान आहे असे वक्तव्य परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांनी केले.
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता पाथरी जि परभणी येथे 5 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या अध्यक्षीय समारोप करताना बोलत होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती पाथरीचे शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्याध्यापक यादव एन .ई., प्राचार्य डहाळे के .एन., श्रीमती पवार एस. व्ही .आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के. एन. यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक वृंद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनुश्री कुलकर्णी हिने केले तर आभारप्रदर्शन प्रा. बालासाहेब गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.