दिव्यांग/अपंग 5% निधी आठ दिवसात वाटप करा दिव्यांग विभाग नगर परीषद पाथरी यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.27/12 /2021 रोजी सोमवारी सकाळी नगर परिषद पाथरी येथे दिव्यांग/अपंग 5% निधी आठ दिवसाच्या आत वाटप करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले हे निवेदन कादरी फसीयोद्यी साहेब दिव्यांग विभाग नगर परीषद पाथरी यांना देण्यात आले व आवक/ जावक विभागाच्या सौ.सुमन गवारे मँडम सौ.रेखा मनेरे मँडम यांच्या हातावर देण्यात आले हे निवेदन देत असतांना दिव्यांग जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल मोहम्मद अलताफ जिल्हा अध्यक्ष मा. देवडे देवलिंग महादेव हे निवेदन दोन्ही संघटनानी दिले ,तसेच प्रहार कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना परभणी जिल्हा प्रमुख शाहुराव गवारे व दिव्यांग जिल्हा अध्यक्ष सौ.आशा साळवे व सदस्य मनोजकुमार माने ,रामप्रभू टोके विजय स्वामी, अशोक तांगडे ,प्रशांत पामे व इतर सभासद दिव्यांग निवेदन देते वेळेस सर्व उपस्थित होते सर्वांच्या नाव व स्वाक्षरी देऊन निवेदन सादर करण्यात आले.