ताज्या घडामोडी

मराठा समाजाचे नेते सुभाष दादा जावळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी लोकसभेसाठी मराठा समाजाचे नेते मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष सुभाषदादा जावळे
यांनी परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी तब्बल 40 वर्ष सामाजिक कार्य करत असणारे आणि विविध संघटनांच्या माध्यमातून
गेली अनेक वर्ष ते मराठा समाजाचे काम सातत्याने करत आलेले आहेत तब्बल तीन
तपाहून अधिक काळ केवळ मराठा समाजासाठी निपक्षपणे काम करत असताना
त्यांनी केवळ समाज आणि समाजाचा विकास हाच ध्यास घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक मराठा संघटनाशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, सक्रिय कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी, सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.आणि आजही सातत्याने विविध संघटनेत काम करत आहेत. समाजासाठी आजपर्यंत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी झालेल्या सुभाषदादावर आजपर्यंत शंभर पेक्षा जास्त गुन्हे केवळ समाजासाठी केलेल्या आंदोलनातून झालेले आहेत. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात काम करत असताना आगदी कै. आण्णासाहेब पाटील,मराठ्यांचे क्रांतिसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील, कै .विनायक मेटे साहेब,कै .देविदास वडजे सर या महान योध्यांसोबत त्यांनी सामाजिक कार्य केले असून
आज परभणी लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समर्थनार्थ सर्व मराठा संघटना एकवटल्या आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना रामेश्वर शिंदे,नितीन देशमुख,विठ्ठल तळेकर,बालाजी मोहिते,गजानन जोगदंड, बाबासाहेब बचाटे , सूर्यकांत मोगल,मंगेश भरकड,राजू शिंदे,गजानन देशमुख, सोपान मोरे,नारायण उबाळे,विनोद भोसले,यांच्यासह संभाजीसेना, मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा मंडळ, शिवमुद्रा संघटना,छावा मराठा संघटना,मराठा परिवार इत्यादी संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close