ताज्या घडामोडी

मुंबईहून परत आलेल्या बांधवांची कानसुर येथे भव्य मिरवणूक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील कानसुर येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काढलेल्या आंदोलनात कानसुर येथील युवक सहभागी झाले होते. आरक्षण जाहीर झाल्याचे कळताच येथील मुंबईहून परत आलेल्या नागरिकांची विजयी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन ढोल ताशा डीजे व फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत गावभर कंदेश्वर मंदीरापर्यंत जल्लोष करण्यात आला .यावेळी गावकर्‍यांच्या वतीने येथील मराठा संघर्ष योंध्य्याचा सत्कार करण्यात आला .
येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने एक मराठा कोटी मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा देत मिरवणुकीत सहभाग घेतला. मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कानसुर येथील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close