ताज्या घडामोडी

दुचाकीस्वाराची बैल – गाडीला धडक

दोघे गंभीर जखमी

प्रतिनिधी – महेश शेंडे विठ्ठलवाड़ा

गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी – विठ्ठलवाडा मार्गावर दुचाकीस्वाराने बैल-गाडीला मागून धडक दिल्याने या अपघातामध्ये
चेक विठ्ठलवाडा ( तांडा ) येथील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार करण सुधाकर झाडे वय 20 वर्ष
व आकाश किसन दुर्गे वय 18 वर्ष हे आज दि.2 नोव्हेंबर रोज मंगळवारला दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी चेक विठ्ठलवाडा हुन विठ्ठलवाडा येथे सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास येत असताना भ.तळोधी-विठ्ठलवाडा मार्गावर शेतातून घरी परतत असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या बैल गाडीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले .
सदर घटनेची माहिती गावात पसरताच बघ्याची गर्दी वाढली.
जखमींना उपचारा करिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील कार्यरत डॉक्टरानी पुढील उपाचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close