कवडशी ( देशमाने)येथे राष्ट्रीय ओबीसी महीला व पुरुष महासंघाची शाखा गठीत

महिला अध्यक्ष पदी सौ कोमल वंजारी यांची तर कुनाल वंजारी यांची पुरुष महासंघ पदी निवड
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी. जनगणनेत ओबीसी चा काँलम निर्माण व्हावा व ओबीसी समाजाची चळवळ तयार करण्यासाठी कवडशी ( देशमाने) येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा व पुरुष राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची शाखा ग़ठीत करण्यात आली. ओबीसी समाजाला संविधानीक अधिकार मिळावा. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी महिला सक्षमिकरणाची गरज आहे या हेतूने शाखा गठित करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ शाखा कवडशी च्या अध्यक्ष पदी कोमल वंजारी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सौ रंजना वंजारी यांची निवड करण्यात आली. सचिव पदी सौ ममता वंजारी यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष पदी सौ कमला वंजारी यांची निवड करण्यात आली.
तर पुरुष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष पदी कुनाल वंजारी, उपाध्यक्ष पदी राजेंद्र वांढरे ,सचिवपदी रोहीत थेरे , यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रामदासजी कामडी , प्रमुख पाहुणे म्हणून कवडूजी लोहकरे ,पुष्पाताई हरने , भावनाताई बावनकर पुष्पाताई सातपुते, राजकुमार माथुरकर उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याचे अभिनंदन करण्यात आले.