मारोडा ग्रामपंचायतचे श्री. विलास भोयर यांची आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्काराकरिता निवड
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्री. विलास बालाजी भोयर यांची शासनाकडून दिल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद स्तरावरील उत्कृष्ट काम करणारे ग्राम विकास अधिकारी पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. स्वच्छ आणि निर्मल ग्राम योजनेअंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबवून प्रत्येक गाव आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व सुदृढ करण्यासाठी शासनाकडून विविध पुरस्कार योजना राबवन्यात येतात.
अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायतचा सन्मान करीत असते जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून शासनाने ग्रामसेवक संघटनेच्या मागणीनुसार मागील काही वर्षापासून पुरस्काराची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2019-20 या वर्षात झालेल्या मूल्यमापनाच्या आधारे मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी विलास बालाजी भोयर यांची शासनाच्या ग्रामविकास विभागाने चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणून निवड केली. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून एकमेव निवड झाल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत कमिटी कर्मचारी वृंद व नागरिक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. भोयर यांनी मा. राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. कपिल कलोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. मयूर कळसे, सवर्ग अधिकारी पंचायत समिति मुल, विस्तार अधिकारी श्री.प्रधान श्री. पुप्पलवार यांचे आभार मानले.