ताज्या घडामोडी

महिलासाठी शौचालय उभारण्याच्या मागणीसाठी बीडीओना निवेदन

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परिसरातील प्रसिद्ध दत्तोबा संस्थान दत्तवाडी या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बीडिओ गंगाखेड यांच्याकडे करण्यात आली.
तालुक्यातील दत्तवाडी शंकरवाडी येथे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे .या मंदिराची ख्याती सर्वदूर पोहोचत असून दर गुरुवारी हजारो भाविक या ठिकाणी दर्शन व आरतीसाठी येतात .दरवर्षी सामुदायिक अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी येणाऱ्या महिला बालकांची संख्या लक्षणीय आहे. पण या संस्थांनच्या ठिकाणी शौचालय नसल्याने येथे येणाऱ्या भाविक भक्त महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. या महिलांची कुचंबणा थांबण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारावे अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली व संस्थानचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त बीडीओ चौधरी यांचे कडे करण्यात आली. यावेळी इसादचे माजी चेअरमन दिगंबर आबा सातपुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, तंटामुक्ती अध्यक्ष माधव दरेकर, ह-भ-प विनायक महाराज मुलगिर, पुंडलिक काळे, दत्तराव राठोड, विक्रम बाबा इंमडे, रामेश्र्वर भोसले पाटील, मुंजाभाऊ लांडे, शिवाजी महाराज बोबडे, नरेन्द्र भालेराव, बळीराम बर्वे आदीसह भक्त उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close