ताज्या घडामोडी

रोटरी क्लब परिवारातील महिलांनी पोलीस दादांना बांधल्या राख्या

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमूर

नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून रोटरी क्लब, चिमूर तर्फे पोलीस स्टेशन चिमूर येथे परिवारासाहित जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला.
पोलीस विभागातील अधिकारी तथा पोलीस दादांनी मागील वर्षापासून सुरू असणाऱ्या महाभयंकर अशा कोरोना काळामध्ये तसेच सण उत्सवाचे वेळेत चोख बंदोबस्त ठेवून खऱ्या अर्थी कोरोना योद्धा चे काम करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच माता भगिनींचे सदैव रक्षण करण्याचे काम पोलिसांनी केले. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीचे अभिनंदन करण्यासाठी रोटरी क्लब, चिमूरने सामाजिक उपक्रमाअंतर्गत येथील रोटेरियन आपले परिवारांसोबत चिमूर पोलीस स्टेशन येथे जाऊन येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस दादांना राख्या बांधून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, उप पोलीस निरीक्षक राजू गायकवाड, पो. शी. प्रमोद गुट्टे, यादव व ईतर पोलीस बांधवांना रोटरी क्लबच्या वतीने रोटेरियन परिवारातील महिलांनी राख्या बांधल्या.
यावेळी रोटरी क्लब, चिमूरचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. महेश खानेकर, सचिव रोटे. वैभव लांडगे, कोशाध्यक्ष रोटे. विनोद भोयर, सहसचिव रोटे. श्रेयस लाखे, रोटे. विशाल गंपावार, किशोर भोयर, पवन ताकसांडे, जयवंत वरघणे, आदित्य पिसे आणि रोटेरियन परिवारातील महिला डॉ. पौर्णिमा खानेकर, नीता लांडगे, अर्चना नवघडे, सपना गंपावार, नर्मदा भोयर, राजश्री ताकसांडे आदी महिला व त्यांचे पाल्य उपस्थित होते. त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्धल परिसरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close