शंकरपूर परिसरात दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी पिळवणूक
सोयाबीन व धानाला योग्य भाव द्या व योग्य भावात खरेदी करा अन्यथा आंदोलन करणार ग्रा.प.सदस्य शुभम मंडपे यांची मागणी
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
ऐन दिवाळी तोंडावर आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही अशातच सोयाबीन ची फसल निघाली आहे आणि सोयाबीन ला वाढीव भाव नसून अक्षरशः शेतकरी राजाची बळीराजाची पिळवणूक शंकरपूर परिसरात होत आहे बाजार समितीची चा भाव हा 5100 आहे व शंकरपूर परिसरात 4300 व 4400 ह्या भावाने अक्षरशः लूटमार व्यावसायिक करत आहेत मात्र याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती चे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तरी यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करू याचा इशारा आंबोली ग्राम पंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी दिला आहे
महिनाभराअगोदरच शंकरपूर मध्ये बोगस खताची निदनिय घटना घडली व यामुळे शेतकऱ्यांची वेळोवेळी पिळवनूक व अन्याय होत आहे आणि सध्या आता दारात दिवाळी असल्याने धान , सोयाबीन ह्या मालाची फसल निघाली आहे मात्र अशातच धानाला योग्य भाव नाही त्यामुळे शेतकरीराजा बळीराजा हा उदास झाला आहे व शेतकऱ्यांवर असंतोषाचे वतावरण निर्मान झाले आहे व शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो मात्र अशातच दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची पिळवणूक ही निंदनीय घटना आहे त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी शेतकऱ्याची बळीराजाची व्यथा मांडली आहे व या प्रकरणावर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू याचा इशारा प्रशासनाला दिला आहे