ताज्या घडामोडी
चिमुर पंचायत समिती सभागृहाला राष्ट्रसंताचे नाव
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमूर पंचायत समिती येथे सभागृहाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नाव देण्यात यावे असे प्रस्ताव पंचायत समिती चे उप सभापती रोशन ढोक यांनी मांडले होते या महिनाच्या मासिक सभेत दिनांक 20/07/2021 सर्वानुमते मंजूर करण्यात आले आज दिनांक 28/07/2021 फलकाचे उदघाटन करण्यात आले चिमूर पंचायत भवनांचाच्या नवीन पंचायत भवनात उदघाटन करण्यात आले या उदघाटन प्रसंगी चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांचे हस्ते उदघाट्न करण्यात आले या प्रसंगी मुख्य कार्यकारण अधिकारी चंद्रपूर डाँक्टर मिताली सेठी पंचायत समिती सभापती सौ. लता पिसे उपसभापती रोशन ढोक माजी उपसभापती शांताराम सेलवटकर आणि पंचायत समिती सभापती मा. अजहर शेख व पंचायत समिती अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.