ताज्या घडामोडी

परडगाव येथे हायवा चे भीषण अपघात

ब्रम्हपुरी पासून जवळ असलेल्या परडगाव येथे काल सकाळी गिट्टीने भरलेल्या हायवा चा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहिती नुसार ट्रक एम एच 40 सीडी 9002 क्रमांचाचे ट्रक निलगिरी बस स्टॅन्ड समोर नाल्यात कोसळून वाहक आणि चालक जागीच ठार झाले. चालकाला झोपेची डुलकी येऊन वाहनवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला गेला आणि सरळ नाल्यात पडला. केबिनचा त्यात चुराळा झाला. ट्रल गिट्टीने भरलेला असल्यामुळे अपघाताची तीव्रता जास्त होती असं सांगितल्या जात आहे. चालकाचे नाव सुरेश आनंदराव भुरले आणि वाहक अमित देवराव कुमरे होते. सुरेश हा 33 वर्ष वय रा. मंडळ ता. लाखांदूर जि. भंडारा आणि अमित हा वय 29 वर्ष रा. ईरवा ता. चिमूर जि. चंद्रपूर येथील होते. घटनेची माहिती काडताच ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि तेथील स्थानिकांच्या मदतीने कॅबिन कापून दोन्ही मृतदेह बाहेर काढले व पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात श्ववीचेदाणासाठी पाठविले. ऐन उमेदीच्या वेळी दोन्ही तरुणांचा कमी वयात मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close