ताज्या घडामोडी

जमात ए इस्लामी हिंद पाथरी कडुन वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथे जमात ए इस्लामी हिंद शाखा पाथरी कडुन राज नगर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले.यामध्ये आंबा,चिकू,आवळा,करंजी,कडुनिंब,पेरू,डाळिंब,जांभूळ ई.वृक्षाचे रोपण करण्यात आले. व ज्या परिसरात वृक्ष लावण्यात आले त्या परिसरातील नागरिक झाडांचे संवर्धन करण्यासाठी तयार झाले .
या वृक्षारोपण कार्यक्रमात सलीम फारूकी सर,नूर सर, मुज़म्मिल टेलर,मुस्तकीम बेलदार, सामी अन्सारी सर, एजाज़ राज,उस्मान भाई, व समाज सेवक अहमद अन्सारी आणि इतर कार्यकर्त्यांनी उत्साह पूर्वक सहभाग घेतला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close