आनंद निकेतन महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुवर्ण पदक
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा आयोजित अमृत क्रीडा व कला मोहत्सवामध्ये आनंद निकेतन महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कब्बडी या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावला , व्हॉलीबॉल या खेळामध्ये तृतीय क्रमांक पटकावला , 100 मी. धावणे या मैदानी खेळ प्रकारामध्ये प्रफुल थुटे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला,एकल गायन कला प्रकारामध्ये सौ हिना मेहता पांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
हा अमृत मोहत्सव 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या क्रीडांगणावर घेण्यात आला होता. यांत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या मा. सौ. कालिंदी देशमाने मँडम यांच्या नेतृत्वाखाली मा. हिना पांडे, सचिन नक्षिने, कमलाकर डुकरे, प्रफुल थुटे, सुमीत शिर्के, तुषार पारखी, सुनील चिमुरकर, संतोष गुंतीवार, भुषण सुर्यवंशी, योगेश मुक्तेवार, देवानंद अलोने, चेतन नागदेवते, राजु तांबेकर, सचिन नांखले, हेमंत पुसाम, पद्माकर सोयाम, हरीभाऊ खुडसंघे, भुपेश साखरे, प्रमोद नागपुरे हे सर्व कर्मचारी सहभागी होतो. व इतर सर्व विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विजयी स्पर्धकांना प्राचार्य डॉ. मृणाल काळे , उपप्राचार्य प्रा.सौ.राधा सवाणे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांनी शुभेच्छा दिल्या.