ताज्या घडामोडी

नाभिक जनकल्याण संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम

अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती .

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर येथील नाभिक जनकल्याण संघा मनच्या वतीने नुकताच 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम तथा उल्लेखनिय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार कार्यक्रम पार पडला . सदरहु कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर संत नगाजी महाराज देवस्थान सभागृह, समाधी वार्ड, येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पराग पेटकरवार यांनी विभूषित केले होते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक जनकल्याण संघ नागपूरचे डॉ.उमेश माद्येशवार , नाभिक जनकल्याण संघ नागपूरचे कोषाध्यक्ष राजेश श्रीखंडेवार , नाभिक जनकल्याण संघ चंद्रपूरचे अध्यक्ष मोहन वनकर , अधिवक्ता अमोल वैद्य यांची उपस्थित होती . या शिवाय या कार्यक्रमाला नागपूर येथील नाभिक जनकल्यान संघाचे अन्य पदाधिकारी डॉ. उमेश राजुरकर, किरण आकनपल्लीवार व शेखर उपल्लवार यांची उपस्थिती लाभली होती.
मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पराग पेटकरवार यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करायला पाहिजे . वैद्यकीय क्षेत्रात नाभिक समाजाचे अनेक डॉक्टर भविष्यात घडल्यास समाजाची उन्नती व प्रगती होईल असल्याचे मत डॉ . उमेश माद्येश्वार यांनी व्यक्त केले. यावेळी मोहन वनकर यांनी समाजाच्या विकासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले .आपण या संघटनेची धूरा सांभाळतांना आपणांसही अनेक अडचणी आल्यात परंतु या सर्व अडचणींवर मात करीत संघटनेचे कार्य नित्यनेमाने सुरूच ठेवले .गेल्या दोन वर्षांपासून या संघटने तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते .आजचा जो कार्यक्रम होतो आहे तो त्याचा एक भाग असल्याचे वनकर बोलताना पुढे म्हणाले.मयुर वनकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भविष्य घडविण्याकरीता कोणते अभ्यासक्रम निवडावे हे या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले. इयत्ता दहावीची कु. अभिश्री रविंद्र नलगिंटवार हिने 96.20 टक्के गुण प्राप्त केले तर बारावीत यश नामदेव दयालवार यांनी 90.30 टक्के गुण मिळवित नाभिक समाज प्रथम येण्याचा मान पटकावला .या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. नागपूरचे राजू पंदीलवार यांचे सहकार्यातून समाजातील समाजसेवक राजु माहागांवकर व चिंतामणराव रूद्रपवार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, रोख रक्कम व गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. दिवंगत प्रमिलाताई माद्येशवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ डॉ. माद्येशवार यांनी नाभिक जनकल्याण संघ, चंद्रपूरला सहयोग राशी म्हणून 51,000/- रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
सदरहु कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अशोक येडेवार तर उपस्थितीतांचे आभार हेमंत रूद्रपवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास नाभिक जनकल्याण संघाचे संघटक प्रकाश आकनपल्लीवार, अनिल वनकर, दत्तात्रेय पंदीलवार, कोषाध्यक्ष संदेश चल्लीरवार, सदस्य विजय रूद्रपवार, विकास वनकर, धिरज सुत्रपवार, गजानन गालपल्लीवार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थींनी, व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close