ताज्या घडामोडी

शाळकरी मुलांच्या शैक्षणिक क्षमतांना वाव देण्यासाठी SIO प्रभणी तर्फे Parvaaz Studio YouTube चॅनलचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे प्रत्येक आघाडीवर इंटरनेट, यूट्यूब आणि सोशल मीडिया या माध्यमांचा अवलंब केला जात आहे. त्याचवेळी व्हॉट्सअॅप, यूट्यूब, मेसेजिंग आणि कोणताही मजकूर मोठ्या प्रमाणात शेअर करता येतो. याच उद्देशाने एस आय ओ परभणी तर्फे”परवाज स्टुडिओ” चा शुभारंभ यूट्यूब चॅनल आयओ दक्षिण महाराष्ट्र सहसचिव एहतेशाम हामी यांच्या उपस्थितीत झाला.या चॅनलवर शैक्षणिक, साहित्यिक, आणि नैतिक व्हिडिओ शेअर केले जातील तसेच इस्लामिक फ्रेंड्स मंडळातील लहान मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांचे व्हिडिओ ग्राफिटी शेअर केले जातील. यावेळी SIO परभणीचे जिल्हा सचिव उबेद खान, IFC सचिव सफवान कादरी, हुजेर खान, अबू बकर अब्बासी उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांनी ह्या चैनलचे व्हिडीओ अवश्य पहावा व विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण व क्षमता जाणून घ्या त्यांना प्रोत्साहन द्या.असे आवाहन जिल्हाध्यक्ष फैजान कादरी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी आणि परवाज स्टुडिओतील तुमच्या मुलांची किंवा विद्यार्थ्यांची कामगिरी सांगण्यासाठी अभियंता ओबेद खान यांच्याशी ९१९१७५६३२१६६ या क्रमांकावर संपर्क साधा. असे आवाहन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close