पाथरी मतदान केंद्रावर उपलब्ध भौतिक सुविधा बाबतचा तहसीलदार यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 24 साठी पाथरी तहसील अंतर्गत असलेल्या 122 मतदान केंद्रावर सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहे का याचा आढावा मंडळ अधिकारी यांच्याकडून तहसील कार्यालय पाथरी येथे श्री शंकर हांदेश्वार तहसीलदार पाथरी यांनी घेतला असून मंडळ अधिकारी यांनी आपल्या सज्जामध्ये असलेल्या मतदार केंद्राच्या इमारतीस भेट देऊन त्या ठिकाणी मतदान केंद्रासाठी लागणारे फर्निचर उपलब्धता, लाईटची व्यवस्था, सवाछताग्रह व्यवस्थित आहेत का, मतदान केंद्राचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित आहे का, मतदान केंद्रावर खोलीच्या बाहेर मतदान केंद्र क्रमांक बी एल ओ चे मोबाईल नंबर अचूक लिहले आहे का, मतदारांना उभे राहण्यासाठी सावली साठी शेड आहे का ,इत्यादी बाबीचा आढावा घेण्यात आला व मंडळ अधिकारी यांनी पुनश्च मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी करून ज्या बाबी अपूर्ण आहेत त्या तात्काळ पूर्ण करून घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या यावेळी श्री वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक,श्री गजानन अन्नपुरे अवल का, श्री भालचंद्र जामकर तां.सह. उपस्थित होते.