ताज्या घडामोडी

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड मध्ये औषधी व वनस्पती प्रदर्शन

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयालयामधे आयोजित ‘ औषधी वनस्पतीच्या प्रदर्शनाला ‘ भेट देऊन मार्गदर्शन केले. प्रदर्शनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना डॉ. शेषराव पाटील यांनी “रानभाज्या व औषधी वनस्पती या ठिकाणी बघितल्या त्या आरोग्यासाठी उत्तम आहेत त्याचा नियमीत वापर करा “, असे सांगून ” अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून लोकांमध्ये व्यावसायिक व कौशल्य ज्ञान मिळवीन्याची प्रेरणा मिळावी यासाठी योजना आखाव्या आणि महाविद्यालयाच्या वाढ आणि विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असने गरजेचे आहे, ‘विद्यापीठ शासनाकडून येणाऱ्या उपयुक्त सोइ सवलती विद्यार्थ्यांपर्यंत पुरवीने आवश्यक आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल एन. कोरपेनवार यांनी ” वनौषधी ही आपल्या आरोग्यासाठी नवसंजीवनीचे काम करत ” , असे म्हटले, ” प्रदर्शनाच्या माध्यमातून वनस्पतीच्या औषधी गुणांची सर्वसामान्यांपर्यंत याची माहिती जाने हीच यां प्रदर्शनाची फलश्रुती होय. ” असे सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन डॉ. शेषराव पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल कोरपेनवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावना व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ अनिल कोरपेनवार यांनी केले व सुत्रसंचालन डॉ आर. जे. रूडे यांनी केले तर आभार प्रा. अंकुश कायरकर यांनी मानले. कार्यक्रमात महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व्रूंद उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close