पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे दहिवड पोलीस स्टेशन येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक १६/९/२०२१ पोलीस मिञ परिवार समन्वय समिती संपुर्ण महाराष्ट्र राज्यात डाॅ.संघपाल उमरे-महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभाग व महाराष्ट्र राज्यातील सर्व संरक्षण विभाग व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत.पोलीस विभागातील समस्यासाठी,पोलीस विभागासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन समिती सतत करित असते.त्याचेच औचित्य साधुन सातारा जिल्हा महिला अध्यक्ष-सौ.प्रियंकाताई जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त,नेञ तज्ञ-डॉ.रविद्रजी बाबर व नेञ तज्ञ-डॉ.लाताताई बाबर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे डोळे तपासणी करुन मार्गदर्शन केले सौ.माधुरीताई गुजराती-पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख,श्री दादा जगदाळे-सातारा जिल्हा उपाध्यक्ष,सातारा जिल्हा प्रमुख-श्री योगेन्द्र सातपुते,श्री सुभाष जाधव-माण तालुका अध्यक्ष,साधना खरात-सचिव,सायली नामदास-सरचिटणिस,निरा गायकवाड-खटाव तालुका अध्यक्ष,गौरी अवघडे-खटाव तालुका उपाध्यक्ष,हर्षा जाधव-एक्झिटिव्ह आॅफीसर,वर्षा जाधव-एक्झिटिव्ह आॅफीसर,अलका जावळे-पोलीस मिञ परिवार समन्वय समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिवड पोलीस स्टेशन येथे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या साठी डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते.या उपक्रमला पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष iतासगावकर,सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश हंगे,आनंदराव निर्मळ,अशोक हजारे,पोलीस हवलदार केंगले,रविंद्र बनसोडे ज्ञानेश्वस जाधव,महिला पोलीस नाईक नीलम रासकर,नेहा कोळेकर,गौरी ढगे धनश्री राऊत,भामा काळे यांनी व दहिवड पोलीस स्टेशन येथिल सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला व समिती ला सहकार्य व मदत केली.व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती च्या सर्व पदधिकाऱ्यांचे आभार व धन्यवाद मानले व पुढेही समिती आमच्या पाठीशी राहिल अशी आश्या व्यक्त केली.पोलीस कर्मचाऱ्यांन कडुन समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे व परिसरातही कौतुक केले जात आहे.