ताज्या घडामोडी

शिवशाही बस व पिकअप च्या धडकेत 4 ठार ,15 जखमी.

आवळगाव वर शोककळा पसरली.

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

गावात काम धंदा नाही, रोजगार नाही म्हणून कामगार आपल्या व परिवाराची पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून बाहेरगावी ऊस तोडणी , धान लावणी, कापूस वेचणी ,तर मिरच्या करण्यासाठी बाहेर गावी जात असतात. बाहेरगावावरून आणलेल्या कमाईतून आपल्या संसाराचा गाडा चालवीत असतात. हे हे करीत असताना कधीकधी नियतीला ही मान्य नसते. नियती माणसाच्या जीवावर उठून बसते.
आवळगाव, हळदा, बोडदा, कुडे सावली तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असलेले शेतमजूर, मजूर वर्ग तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. मिरची तोडणीचे काम आटोपून ते पिकअप वाहन भाड्याने घेऊन स्व गावी होळीच्या सणानिमित्त त्याने परत येत होते. परत येत असता चौडमपल्ली जवळ चंदन खेडी फाट्यालगत आष्टी- आलापल्ली मार्गावर अहेरी आगाराची शिवशाही बस व पिकअप वाहन यांची समोरासमोर धडक होऊन घटनास्थळी वाहन चालकासह तीन कामगार ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये सौ नयना प्रभाकर निकुरे. आवळगाव
देवाजी खोकले .आवळगाव
साई राहणार तेलंगणा तर कुडे सावली येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
जखमी मध्ये शुभम प्रभाकर निकुरे, पुष्पा देवाजी खोकले (मृतकाची ची पत्नी) सौ निराशा जुमनाके, सत्यम जुमनाके हे सर्व आवळगाव.
सौ. तानाबाई आवारी, अर्चना आवारी राहणार हळदा.
धनराज चुधरी, संतोष मेश्राम ,
सौ ज्योती मेश्राम, मधुकर चुधरी, सौ प्रमिला चुधरी राहणार बोडधा.
सौ पुष्पा मस्के, कल्पना मारबते, कविता चौधरी, राहणार डोंगरगाव तालुका सावली.
प्रशांत भोयर राहणार गेवरा खुर्द तालुका सावली.
सुरेश चिंतापारटी राहणार चेंनुर तेलंगणा.
सर्व जखमींना उपचार गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयामध्ये सुरू आहे.
या अपघातात एकूण 15 जखमी झाले असून 10 जण गंभीर जखमी आहेत.
आज झालेल्या या अपघातामुळे आवळगाव, हळदा ,बोडदा,कुडे सावली गावावर शोककळा पसरली असून होळी व धुलिवंदनाचा सण दुःखाच्या सावटात साजरा करावा लागत आहे.
आज झालेल्या या दुर्घटनेमुळे आवळगाव व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close