गोवर्धन येथे अधिकाऱ्यांकडूनच संचार बंदीचे उल्लंघन

ग्रामीण प्रतिनिधी :अंकुश खोब्रागडे गोवर्धन
कोरोना चा वाढता प्रसार बघता सरकारने 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत कडक निर्बंध सह लाक डाऊन घोषणा के .ली. लग्नसमारंभात होणाऱ्या गर्दीपासून कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो हे लक्षात घेऊन सरकारने विवाह समारंभात केवळ पंचवीस जण उपस्थित राहू शकतील असा आदेश काढला. असून आज गोवर्धन (ता. मुल) येथील लग्नसमारंभात 25 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. व तलाठीसुद्धा हजर होते. तलाठी यांनी हे माहिती आपल्या वरीष्ठ अधिकार्यांना दिली असता. अधिकारी स्विप्ट या गाडीने तिथे हजर झाले गोवर्धन येथील ग्रामीण प्रतिनिधी ( पोर्टल ) माहिती गोळा करण्यासाठी गेले असता. अधिकाऱ्याने प्रतिनिधी ला धुडकावून लावले व संचारबंदी या नियमाबद्दल कारवाई न करता परस्पर रीतीने लग्न समारंभ पार पाडले. लग्न समारंभ हे गावातील ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांच्या घरचे असून. तलाठी व त्यांच्या वरीष्ठ अधिकारी यांना माहिती असून सुद्धा निष्काळजीपणा दाखविला ह्यावर असं समजायचं की फक्त जे अधिकारी व पदाधिकारी यांना संचारबंदी उल्लंघन करण्याचा अधिकार सरकारने दिला आहे. जे पदाधिकारी नाही त्यांच्यावर संचारबंदी च्या उल्लंघनाची कारवाई करण्यात यावी असा अधिकार राज्य सरकारने दिला आहे.