ग्राम पंचायत आंबोलीच्या एपीजे अब्दुल कलाम वाचनालयाला SDM चिमुर यांची भेट
एक वर्षाचे वर्तमानपत्र व लोकसेवा आयोगाची पुस्तके देणार भेट
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमुर येथून जवडच असलेल्या आंबोली ग्राम पंचायत च्या एपीजे अब्दुल कलाम वाचनालयाला चिमुर चे उपविभागीय अधिकारी सकपाळ सर यांनी भेट दिली तालिलुक्यातील ही प्रथमच ग्राम पंचायत असावी की जिथे वाचनालयाची व्यवस्था आहे व या ठिकाणी MPSC व UPSC चे विद्यार्थी घडत आहेत ,
चिमुर तहसील कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी (SDM) सकपाळ सर कार्यालयीन कामाकरीता
आले असता यावेळी आंबोली ग्राम पंचायत च्या एपीजे अब्दुल कलाम वाचनालयाला भेट दिली
नऊ महिण्यागोदर या वाचनालयाची स्थापना व व्यवस्था आंबोली ग्राम पंचायत च्या वतीने गावातील व परिसरातील विद्यार्थि अधीकारी घडावेत या संकल्पनेतून करण्यात आली आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी सकपाळ सरांनी भेट दिली व एक वर्षाचे वर्तमान पत्राची व्यवस्था करून देणार आहेत व या वाचनालयात विद्यार्त्यांकरिता आवश्यक ती पुस्तकांची व्यवस्था करणार आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी सकपाळ सर ,मंडळ अधिकारी बुराडे सर , तलाठी पाटील सर , गराटे सर , आंबोली ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे , मधूकरजी नागपुरे , स्वप्नील वाकडे , प्रफुल दडमल , विशाल नागपुरे तथा आदी विद्यार्थी उपस्तीत होते