नाबार्ड मार्फत चिमूर येथे नेतृत्व विकास कार्यक्रम संपन्न
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जी.चंद्रपूर यांच्या वतीने चिमूर जि.चंद्रपूर येथे दिनांक16नोव्हेंबर 2021 रोज मंगळवारला नाबार्ड पुरस्कृत ईशक्ति व जे.एल.जी.प्रकल्पा अंतर्गत बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या प्रशिक्षनात मा.तृणाल फुलझेले साहेब सहायक प्रबंधक नाबार्ड चंद्रपूर, मा.शास्त्रकार साहेब शाखा अधिकारी,चंद्रपूर जिल्हा मध्य.सहकारी बँक चिमूर , मा.व्ही.एस.हेडाऊ साहेब शाखा प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चिमूर, मा.पुरुषोत्तम वाळकेअध्यक्ष किसान मित्र संस्था नेरी,मा.नंदा वाळके ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात मा.काळमेघ साहेब व हेडाऊ साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात बचत गटातील महिलांनी बँकेच्या योजना लाभ घ्यावा व नियमित कर्ज परतफेड करून आर्थिक स्वावलंबी बनावे असे मनोगत व्यक्त केले, तर मा.फुलझेले साहेब यांनी नाबार्ड च्या विविध योजना व बचत गटातील महिलांनी नेतृत्व निर्माण करावे शासकीय योजनाचा लाभ घ्यावा गटाची नियमावली वापर करून गटात सक्षमता निर्माण करावी असे आव्हान केले. मा.पुरुषोत्तम वाळके यांनी ईशक्ती व जे.एल.जी.गटाबाबत ची संकल्पना व कर्ज धोरण या विषयी मार्गदर्शन केले. महिलांना उद्योग प्रशिक्षण या प्रशिक्षणाचे आयोजन अपना मंगल कार्यालय सभागृह चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे करण्यात आले.कार्यकर्माचे सूत्र संचालन ज्ञानेश्वर कामडी यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर पोहीणकर व नितीन नगराळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याशाठी नंदा वाळके,सिद्धांत वाळके, मयुरी काळमेघ,शीतल सोरदे,रेणुका फुसे, रजनी गुळदे, सुनंदा सतिकोसरे,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला चिमूर, काग,नवेगाव ,वडाळा,सोनेगाव,बाम्हनी, तळोधी, तुकूम,येथील जे.एल. जी.व बचत गटातील महिलां सहभागी होत्या.
अधिक माहिती व प्रशिक्षण करीता सम्पर्क साधावा :::: 🔸🔸🔸🔸🔸श्री पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष मोबा.9421707602 संस्थेचा पत्ता : C/O गुरुदेव पत संस्था बिल्डिंग नेरी (चिमूर ) जि.चंद्रपूर महाराष्ट्र येथे संपर्क 9421707602 ला साधावा. असे पत्रकांद्वारे पुरुषोत्तम वाळके यांनी कळविले आहे.