गार्डन चे गेट तुटून १ वर्ष झाले तरी प्रशासनाचे दुर्लक्ष
तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी येथील शांती नगर गणवीर दवाखान्यासमोरील गार्डन ५८५१६६ लाख निधी खर्च करून बनवण्यात आले होते. त्या गार्डन मध्ये २ गेट बसवण्यात आले होते. त्यातील मोठा गेट मागील वर्षी तुटून पडला.
त्याचं वेळी शांती नगर वॉर्डातील काही बालक तिथे खेळत होते पण सुदैवाने त्यावेळी त्यांच्यासोबत काही अनर्थ घडला नाही. याकडे प्रशासनाने फक्त येऊन बघण्याची भूमिका घेतली . १ वर्ष होऊन गेले तरी काही काम झालेले नाही तसेच तिथे व्यायाम करण्याचेसुद्धा साहित्य लावलेले आहे येथील नगरवासी नियमित व्यायाम करायला यायचे परंतु तिथे मोठ्या प्रमाणात गवत आणी कचरा वाढलेला असून आत्ता नागरिक व्यायाम करू शकत नाहीत. म्हणून आत्ता गार्डन चे संपूर्ण सौंदरीकरण तसेच पडलेल्या गेट चे काम लवकरात लवकर करावे अशी शांती नगर वाशीयांची मागणी आहे. तरी लवकरात लवकर प्रशासणाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.