ताज्या घडामोडी

मजरा येथे महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामस्वछता अभियान

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील मजरा लहान येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामस्वछता अभियान राबवून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सम्पूर्ण गावात रस्त्यावर असलेल्या झाडें, झुडपे व अनावश्यक गवत काढून गाव स्वच्छ करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कमेटी सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, तंटामुक्त समिती अध्यक्ष व सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक,मोठया संख्येने महिला व पुरुष यांनी सहभाग दर्शवत स्वच्छता अभियान यशस्वी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close