रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी घेतली चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट
अशिद मेश्राम यांच्या आंदोलनाविषयी केली चर्चा
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
रास्त मागण्यांसाठी युवा नेते तथा प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालूका प्रमुख अशिद अमरदिप मेश्राम हे गेल्या १९फेब्रूवारी पासून काग मुक्कामी लाक्षणिक उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.दरम्यान आज बूधवार दि.२१फेब्रूवारीला रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची दुपारी भेट घेत त्यांना उपरोक्त रास्त मागण्यांसंदर्भात एक लेखी निवेदन देत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.या वेळी चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश घारे, या शिवाय पडोली येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे प्रामुख्याने उपस्थित होते. काग येथील रास्त मागण्यांबाबत अशिद मेश्राम यांनी या पूर्वी चिमूर नगर परिषदेला एक लेखी निवेदन दिले.पण साधी दखल तेथील नगर परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी घेतली नाही .त्यामुळे मेश्राम यांना उपोषणाला बसून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधावे लागले अशी प्रतिक्रिया महेश हजारे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज चंद्रपूर मुक्कामी दिली.या बाबतीत आपण एक दोन दिवसात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेणार असल्याचे हजारे म्हणाले.