ओबीसी आरक्षणाकरिता वेळ प्रसंगी पहिली काठी माझ्या पाठीवर असेल – आ.रत्नाकर गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती गंगाखेड चे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु असून धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय प्रतिनिधित्वाचे आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंगाखेड ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली असून १)ओबीसी इम्पॅरिकल डाटा एक महिन्याच्या आत सादर करावा २)ओबीसीचे राजकीय, नोकरीतील व शैक्षणिक आरक्षण रद्द करू नये अशा विविध मागण्यासाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
ओबीसींचे आरक्षण टिकविण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष करणे अत्यंत महत्त्वाचे असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सर्व समाजाला सोबत घेऊन संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. संघर्ष करताना कसल्याही परिणामांची चिंता न करता ओबीसी आरक्षणासाठी वेळप्रसंगी पहिली काठी माझ्या पाठीवर असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. यासाठी मी सदैव आपल्या पुढेच असेल. शासन व प्रशासनाने ओबीसी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर लाखो ओबीसी बांधव सोबत घेऊन रस्त्यावर उतरून हक्कासाठी संघर्ष करावा लागेल यासाठी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीला माझी सर्वतोपरी सहकार्य असेल असे आमदार गुट्टे याप्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी याप्रसंगी जि.प. सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, सभापती मुंजाराम मुंडे, कृष्णाची सोळंके, हनुमंत मुंडे, नंदकुमार पाटेल, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, राजू पटेल, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, नितीन बडे, मगर पोले, शेख खालिद भाई, ब्रिजेश गोरे, इंतेसार सिद्दिकी, छोटू कामत, संभुदेव मुंडे, राजेभाऊ बप्पा कदम, संभाजीदादा पोले,प्रल्हाद शिंदे, बालाजी लटपटे, प्रदीप शिंदे, सतीश घोबाळे, अशोक घोबाळे ,वैजनाथ टोले, विलास गाढवे, इक्बाल चाऊस, महेश आप्पा शेटे, गोविंद महाराज पुरी, सुंदर मुंडे, भास्कर ठावरे, भरत भेंडेकर, बळीराम सोडगीर, दत्ता गाढे, नारायण शेंडगे,बळीराम मुंडे, निवृत्ती भेंडेकर, रामेश्वर भोळे, एकनाथ गेजगे,प्रकाश नागरगोजे आदी उपस्थित होते.