ताज्या घडामोडी

आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकऱ्यांनी टोकाचे पाउल उचलू नये, आमच्याशी एकदा संपर्क साधा- आम आदमी पार्टी

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

आम्ही योग्य नियोजन व संवाद करून आपले दु:ख कमी करू शकतो – प्रा. डॉ. अजय पिसे

आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकरी हा या देशाचा कणा आहे, परिस्थिती प्रतिकुल असतांनाही आपल्या मेहनतीने घामाच्या धारा ओतून पिक काढून जगाचं पोट भरण्याची हिम्मत असलेला शेतकरी हा जगाला जीवन जगणे शिकवीत असतो परंतु सध्याच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या पिक नासाडी मुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये.

कर्जबाजारी व पिक नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने एकदा आमच्याशी संपर्क साधावा आम्ही योग्य नियोजन करून आपले दु:ख कमी करू शकतो. असा विश्वास आम आदमी पार्टी चे चिमूर-नागभीड विधानसभा समन्वयक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी दाखविला.

आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याला कर्जबाजारी मुळे सावकार व बँका त्रास देत असतील तर योग्य संवाद साधून आणि उचित नियोजन करून शेतकऱ्यांचे ओझे कमी केल्या जाऊ शकते. आर्थिक तणावात असलेल्या शेतकऱ्यांनी आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांना आपला मित्र समजून वयक्तिक रित्या किंवा फोनवर संवाद साधल्यास आपला तणाव कमी करण्यास आम्ही मदत करू शकतो, चिमूर-नागभीड विधानसभेत आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांना अशे प्रकरण हाताळण्यासाठी तज्ञांनी मार्गदर्शन केलेले आहे असे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close