खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निषेध
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक 09/04/2022 रोजी राष्ट्रवादी भवन पाथरी येथे आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील “सिल्व्हर ओक” या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करताना, सौ.भावनाताई नखाते अध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.मीराताई सरोदे पाथरी विधानसभा अध्यक्षा महिला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.रेखाताई मनेरे शहराध्यक्षा पाथरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.सीताताई घाटूळ,सौ.राधाताई जाधव,सौ.रेणूकाताई सावळे,सौ.अयोध्याताई मोगल,सौ.सुमनताई साळवे,सौ.इंदुमतीताई धनले,सौ.नंदाताई वाळके,सौ.शोभाताई शिंदे,सौ.लक्ष्मीताई झिंजान,सौ.सिंदूताई शेळके व सौ.लताताई गरड इत्यादी महिला उपस्थित होत्या.