पळसगांव येथे आमदार चषक २०२४ कबड्डी स्पर्धेचे थाटात बक्षीस वितरण
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडून आर्कषक चषक व रोख पारितोषिक
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उपसंपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान न्यु राजे क्रिडा मंडळ पळसगांव च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचा समारोप सोमवारी करण्यात आला.
यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक व बक्षीसाची रक्कम देऊन गौरविण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळसगाव सरपंच सरिता गुरनुले होते. प्रमुख अतिथी म्हणून पिपर्डा सरपंच आकाश भेंडारे, दुमदेव बोरकर, प्रभाकर गजभिये, उपसरपंच तुळाशदास शिवरकर, तमुअ संजय सोनेकर, हपिज शेख, प्रदिप गजभिये, जानिक बन्सोड, झानेश्वर गुरनुले, संजय बनसोड, मसुद शेख, सुरज आनंदवार, विकास खोब्रागडे,आदी उपस्थित होते. खेळाडूच्या निवास सह भोजनाची व्यवस्था मंडळाच्या वतिने करण्यात आली होती.
कबड्डी स्पर्धेसाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्याकडून प्रायोजित १८ हजार रूपये रोख पारितोषिक व चषक क्र. १ जय बजरंग क्रिडा मंडळ शिवणी यांनी पटकाविला, बंटीभाऊ भांगडीया यांच्याकडून प्रायोजित १५ हजार रूपये व चषकाचे द्वितीय पारितोषिक भवानी क्रीडा मंडळ पळसगाव क्र. २ यांनी पटकाविला. बंटीभाउ भांगडिया यांचे कडून तिसरे सात हजार रु शिव छत्रपती क्रिडा मंडळ वानेरी यांनी क्र ३ चा पारितोषीक पटकाविले.तिन दिवस चाललेल्या स्पर्धाला गावकरी महिला पुरुष व परिसरातील नागरीकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश शेंडे तर आभार जिवन शेडे.यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रपाल सोनवाने,मधुसुदन मेश्राम, अंकित गजभिये,वैभव झोडे,अनिकेत कावळे, शुभम कोहळे, व मंडळाच्या सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.