मुस्लिम समाजाच्या विद्यार्थी हिताच्या मार्टी संस्थेस मंत्रिमंडळाची मंजुरी

अर्धी लढाई जिंकली, पुढील लढाई निधीसाठी लढणार – प्रा. अमर शेख
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अनेक दिवसांपासून मुस्लिम समाजाची मागणी असलेला बहुचर्चित आणि अत्यंत आवश्यक असणारा विद्यार्थि हिताचा प्रश्न म्हणजे मार्टी ( मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्युट ) राज्यभरात माझ्यासह मुस्लिम समाजाच्या रेट्यामुळे राज्य सरकारने ऐरणीवर आणत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देत निकाली लावला आहे, याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अमर शेख यांनी व्यक्त केली आहे. पुढे पत्रकात असे म्हटले आहे की, मार्टी संस्थेला मंजुरी मिळण्यासाठी मी स्वतः अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह विभागीय आयुक्त व इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत यासंदर्भात मागणी केली होती, ती मान्य झाली,परंतु माझी खरी लढाई निधीसाठी असणार आहे,जर मार्टीला टप्प्या टप्प्याने का होईना परंतु निधी मिळणे आवश्यक आहे,यामुळे जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांना याचा उच्च शिक्षणाची फायदा होणार आहे, राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दहा कोटी निधी देण्याची मागणी करणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.अमर शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.