डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार- मा. रविकांत खुशाल बोपचे

डोंगरगाव येथिल धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात संपन्न..!
प्रतिनिधीःसंजय नागदेवे तिरोडा
डोंगरगाव(खडकी) ता. तिरोडा येथे ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री रविकांत खुशाल बोपचे यांनी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत सर्व उपस्थितांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री रविकांत बोपचे यांनी सांगितले की, बौद्ध धम्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूलभूत सिद्धांतांची शिक्षा देतो. बौद्ध धम्माचा पाया नैतिक आचरणावर असुन शिकवण लोकशाहीवादी आहे. या विचारांनीच प्रेरित होत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी कार्य केले आणि त्यांनी बनविलेल्या संविधानामुळेच आज भारतातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने व भेदभावरहित जीवन जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे सांगत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले.
यावेळी श्री रविकांत बोपचे यांच्यासह जि प सदस्य श्री जगदीश बावनथडे, सरपंच श्री शिशुपाल पटले, प. स. सदस्य सौ कविताताई सोनेवाने, प्रमुख वक्ते श्री पि. टी. रंगारी सर, श्री दिलीप बिसेन, उपसरपंच श्री शुभम भैसारे, श्री साहेबलाल बंसोड, सौ. ताराताई धमगाये, सौ वैशालीताई बारसागडे, सौ मायाताई सोनेवाने, माजी सरपंच धनेश्वरी वासनिक, सौ प्रमिला कोकुडे, श्री गजानन रहांगडाले आदिंसह गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.